शेतीसामाजिक

शेतीला पूरक जोडधंदा करा खेकडा पालन व्यवसाय सुरू मिळवा लाखो रुपये उत्पन्न.

कमी खर्च आणि कमी जागेत शेतकऱ्यांने 9 महिन्यात मिळवले 6 लाखाचे उत्पन्न. लाखोचे उत्पन्न देणारा भरोसेमंद व्यवसाय

शेतीपूरक जोडधंदा खेकडा पालन व्यवसाय करा सुरू मिळवा लाखो रुपये उत्पन्न.

शेतीपूरक जोडधंदा खेकडा पालन हा व्यवसाय शेतीवर येणाऱ्या नैसर्गिक संकटातून सावरण्यासाठी एक उत्तम उपाययोजना ठरेल.

सध्याच्या काळात शेतीवर येणारे नैसर्गिक संकटे त्यावर हमी शेतीमालाच्या बाजारभावाची कटकट यातून शेतकऱ्यांना सावरण्यासाठी शेतीला पूरक असा जोडधंदा म्हणून एखाद्या चांगल्या व्यवसायाची निवड करणे आवश्यक ठरले आहे.

अतिवृष्टी महापूर यासारख्या संकटातून सावरण्यासाठी असे बरेच काही पूरक व्यवसाय आहेत.

जे की शेतकऱ्यांना भरोसे मंद लाखाचे उत्पन्न अगदी कमी जागेत आणि कमी खर्चात मिळवून देऊ शकतात.

अशाच एका भन्नाट व्यवसायाची कल्पना आम्ही शेतकरी बांधवांसाठी नव्याने घेऊन येत आहेत.

नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण जाणून घेऊया कमी जागेत आणि कमी खर्चात खेकडा पालन व्यवसाय कसा सुरू करायचा.

या व्यवसायातून तुम्हाला लाखो रुपयाचे उत्पन्न मिळणार आहे.  यासाठी  ना जास्त भांडवलाची आवश्यकता आहे ना जास्त   काही प्रशिक्षण घ्यायची तुम्हाला गरज भासणार नाही.

अगदी मोजक्या खर्चात कमी जागेत हमखास लाखो रुपये उत्पन्न या व्यवसायातून तुम्हाला मिळणार आहे.

हा पूरक व्यवसाय शेतीला जोडधंदा म्हणून तुम्ही निसंकोचपणे करू शकता. 

चला तर मग जाणून घेऊया या कल्पनेतून  उभारलेला शेतीपूरक जोडधंदा खेकडा पालन या व्यवसायाची यशोगाथा

शेतीपूरक जोडधंदा म्हणून शेतकऱ्याने युक्ती करत हिंगोली तालुक्यातील सेनगाव येथील एका युवा शेतकऱ्यांने खेकडा पालन सुरू केला.

या व्यवसायातून युवा शेतकरी भारत जहरव हे लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवीत आहेत.  यासाठी कमी जागा आणि कमी खर्च येत असल्याचेही शेतकऱ्याने सांगितले.

ही कल्पना नापिकेला आणि सततच्या नैसर्गिक संकटातून सावरण्यासाठी शेतकऱ्यांना एक वरदान म्हणून काम करेल अशी या शेतकऱ्याचे म्हणणे आहे.

सेनगाव तालुक्यातील बाभूळगाव येथील शेतकऱ्याने शेतीला पूरक असा जोडधंदा म्हणून खेकडा पालन व्यवसाय सुरू केला आहे.

बाभूळगाव येथील शेतकरी भारत जहरव यांनी स्वत:च्या शेतात 20 बाय 50फूट आणि आठ फूट खोल शेततळे तयार करून त्यात खेकडा पालन व्यवसाय सुरू केला.  

कुसुम सौरपंप योजनेच्या नियमात बद्ल आता या शेतकऱ्यांना मिळणार नाही सोलारपंप

 

खेकडा पालन व्यवसाय चे युट्युब वर प्रशिक्षण घेत केली सुरुवात.

खेकडा पालन कसे करायचे, याची माहिती या शेतकऱ्याने ‘यू ट्यूबवरून’ मिळवली. यानंतर खेकडा पालन व्यवसाय सुरू केला होता.

शेतकरी भारत जहरव यांनी स्वतःच्या शेतामध्ये आठ फूट खोल शेततळे तयार केले आणि त्यात खेकडे पालन सुरू केले, यातून यावर्षी त्यांना सहा लाख रुपये उत्पन्न मिळाले आहे.

डोंगराळ भागातील पाच एकर शेतीचे मालक असलेले भारत जहर यांनी डोंगराळ भागात  हा व्यवसाय नव्याने सुरू करत शेतकरी बांधवांसमोर एक आदर्श उदाहरण प्रक्षेपित केले आहे.

या व्यवसायातून लाखो रुपये कमाई करून कमालच करून दाखवली. यासाठी शेतात २० बाय ५० फूट आणि ८ फूट खोल असे शेततळे बांधून घेतले आहे. 

शेतीपूरक जोडधंदा खेकडा पालन

शेततळे तयार करून त्यात त्यांनी खेकडा पालन व्यवसाय सुरू केला आहे. आत्ता त्यांनी या शेततळ्यात दोन क्विंटल खेकड्याचे नर आणि मादी रोपे आणून सोडले.

या खेकडा पालन व्यवसायाबद्दल सर्व माहिती त्यांनी यूट्यूब वरून घेत लाखो रुपये कमाई करत आहेत आहे.  

वर्षाला मिळत आहे 6 लाख रुपये उत्पन्न

यूट्यूबवर भरत यांनी खेकडा पालनाचा व्हिडिओ पहिला आणि पाहताच क्षणी हा उपक्रम आपणही राबवायचा ठरवले.

स्वतः च्या शेतात या युवा शेतकऱ्यांने 20 बाय 50 फूट आणि ८ फूट खोल असे शेततळे खोदून त्या शेत तळ्याचे काँक्रिटच्या माध्यमातून बांधकाम केले.

बांधकाम करण्यात आलेल्या शेततळ्यात त्यांनी काही  प्रमाणात दगड , माती टाकली, त्यानंतर बीज म्हणून या शेततळ्यात 2 क्विंटल खेकडे या शेततळ्यात सोडण्यात आले.

एका वर्षाच्या मेहनतीनंतर या खेकड्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी मिळवले वार्षिक सहा लाख रुपये उत्पन्न. 

खेकड्यांना जोपासण्यासाठी गुंतवणुकी व्यतिरिक्त कोणताही खर्च नाही. चिकन आणि मासे यातील वेस्टेज या खेकड्यांना खायला दिले जाते.

दर आठ दिवसाला शेत तळ्यातील पाणी बदलून ही काळजी घेतली जाते.

हिंगोलीच्या शेतकऱ्याची भन्नाट आयडिया लढवत खेकडा पालनातून वर्षाला ६ लाखांचे उत्पन्न घेतोय.

फक्त ९ महिन्यात विक्री लायक खेकडे तयार झाले आहेत. जवळपास १२ क्विंटलहून अधिक खेकडे या शेततळ्यात विक्रीसाठी तयार आहेत. 

 

कुसुम सौरपंप योजनेकरिता या 20 जिल्ह्यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू

ग्राहकाकडून आहे मोठ्या प्रमाणात मागणी..

खेकड्याला आयुर्वेदिक महत्त्व मोठं असल्यानं मागणी जास्त असते.

५०० रुपये दर किलो प्रमाणे या खेकड्याची विक्री होत आहे. यातून फक्त ९ महिन्यात ६ लाख रुपयांचे उत्पन्न झाले आहे. 

शेतीपूरक जोडधंदा खेकडा पालन
शेतीपूरक जोडधंदा खेकडा पालन

विचित्र समजल्या जाणाऱ्या हा प्राणी आहे तो म्हणजे खेकडा अर्थात त्याला इंग्रजीत क्रॅब (crab)असे म्हणतात.

शाकाहारी लोकांसाठी हा एक विचित्र प्राणी असला तरी मांसाहारी खास करून मासे प्रेमींसाठी खेकडा ही एक मेजवानी असते.

मांसाहारी लोकांची खेकड्याला मोठ्या प्रमाणात पसंती आहे यामुळे बाजारपेठेत खेकड्याला दर किलोप्रमाणे 500 रुपये पेक्षा जास्त दर मिळत आहे. 

तुम्हीही मिळू शकता या व्यवसायातून लाखो रुपये उत्पन्न.

कुक्कुटपालन, पशुपालन किंवा मत्स्यपालन  या सर्वांशिवाय शेतकरी खेकड्याची शेती करून चांगला नफा मिळवू शकतात.

हे हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्याने करून दाखवले आहे. खेकडा हा एक समुद्री खाद्यपदार्थ आहे. 

केवळ भारतातच नाही तर  भारता देशा बाहेर जगातील अनेक देशांतील लोक ते अगदी आवडीने खातात. 

CISF TRADESMAN BHARTI 2022 धोबी कुक माळी यासारख्या पदांसाठी मेगा भरती

 

मग कशी आहे व्यवसाय कल्पना आहे की नाही भन्नाट माहिती.

तुम्हाला ही माहिती आवडल्यास तुमच्या शेतकरी मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.

अशा नवनवीन कल्पना साठी आणि शेती विषयी अपडेट माहितीसाठी आमच्या साईटला वारंवार भेट देत चला.

दररोजच्या नवीन अपडेट साठी तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता.

Related Articles

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!